सर्वाधिक ५३ बदल्या ग्रामसेवकांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:41+5:302021-07-27T04:22:41+5:30

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २० जुलैपासून जिल्हा परिषदेत सुरू आहे. पहिल्या दिवशी (दि. २०) सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, ...

The highest number of 53 transfers of Gram Sevaks | सर्वाधिक ५३ बदल्या ग्रामसेवकांच्या

सर्वाधिक ५३ बदल्या ग्रामसेवकांच्या

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २० जुलैपासून जिल्हा परिषदेत सुरू आहे. पहिल्या दिवशी (दि. २०) सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, तसेच कृषी विभागातील ४९ जणांच्या बदल्या झाल्या. नंतर २२ जुलैला लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा व पशुसंवर्धन विभागाच्या ११ बदल्या झाल्या. २४ जुलै रोजी शिक्षण विभाग, आरोग्य विभागाच्या ३४ जणांच्या बदल्या झाल्या.

सोमवारी (दि. २६) महिला बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सांख्यिकी १, पर्यवेक्षिका ७, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक ५३, ग्रामविकास अधिकारी ८, विस्तार अधिकारी पंचायत १, विस्तार अधिकारी सांख्यिकी २, बांधकाम विभागातील शाखा अभियंता ५, स्थापत्य अभियंता सहायक ४ अशा एकूण ८१ बदल्या झाल्या.

उद्या (दि. २७) आरोग्य विभागातील बदल्या होणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत १७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Web Title: The highest number of 53 transfers of Gram Sevaks