हातमपुरा ते डावरे गल्ली रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:14+5:302021-05-10T04:21:14+5:30

अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक ११मधील हातमपुरा ते डावरे गल्ली रस्ता डांबरीकरण कामाची महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश ...

Hatampura to Davre street work started | हातमपुरा ते डावरे गल्ली रस्त्याचे काम सुरू

हातमपुरा ते डावरे गल्ली रस्त्याचे काम सुरू

अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक ११मधील हातमपुरा ते डावरे गल्ली रस्ता डांबरीकरण कामाची महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी पाहणी करुन संबंधितांना सूचना केल्या. यावेळी माजी नगरसेवक सादिक शेख, शेख समीर, हनीफ शेख, राजू शेख, रियाज सय्यद, असिफ शेख, तौफिक कुरेशी, अकमल शेख, अस्लम शेख, आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक सादिक शेख यांनी या भागातील अनेक कामे मार्गी लागत असल्याचे सांगितले. घुले म्हणाले की, सद्यस्थितीत आरोग्य सेवेला महत्त्व देऊन नागरिकांचे लसीकरण, तपासणी, हॉस्पिटलायझेशन या बाबींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचवेळी प्रभागातील विकासकामांकडेही लक्ष दिले जात आहे. या दोन्हींचा समन्वय साधत नागरिकांना सेवा देण्यावर भर आहे. प्रभागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देऊन नियोजित कामे पूर्ण करण्यात येत आहेत. यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य मिळत आहे.

फोटो- ०९ रोड

Web Title: Hatampura to Davre street work started