शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

गुरु अर्जुन देव कोविड सेंटरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST

अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घर घर लंगरसेवा व महापालिकेच्यावतीने सुरू केलेल्या हॉटेल नटराज येथील गुरु अर्जुन ...

अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घर घर लंगरसेवा व महापालिकेच्यावतीने सुरू केलेल्या हॉटेल नटराज येथील गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरला नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट दिली. गमे यांनी कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांशी संवाद साधला. तसेच घर घर लंगर सेवेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

घर घर लंगर सेवेने महापालिकेच्या सहकार्याने ३ मार्चपासूनच हॉटेल नटराज येथे व महिलांसाठी जैन पितळे वसतिगृहात गुरू अर्जुन देव कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण चांगले होऊन घरी परतले आहेत. पहिल्या टाळेबंदीत अनेकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करुन तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे शहरात मोठे सामाजिक कार्य उभे करून सर्वांच्या मनात एक आदर व विश्‍वास निर्माण केला असल्याचे सांगून हरजितसिंह वधवा यांनी घर घर लंगर सेवेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. घर घर लंगरसेवेच्या सामाजिक उपक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लबचे सहकार्य लाभत आहे, असे वधवा म्हणाले.

यावेळी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. प्रदीप कळमकर, घर घर लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, कैलाश नवलाणी, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, किशोर मुनोत, करण धुप्पड, सुनील छाजेड, मनप्रीत धुप्पड, सनी वधवा, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम बेट्टी आदी उपस्थित होते.

..........................

०८ घर घर लंगर सेवा

गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरला नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. राजेद्र भोसले, डॉ. सुधाकर शिंदे, जगन्नाथ भोर, सौरभ अग्रवाल, श्रीनिवास अर्जुन, डॉ. संदीप सांगळे, शंकर गोरे, हरजीतसिंह वधवा आदी उपस्थित होते.