कुकाणा : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील शेतकऱ्यांना आष्टी (ता. बीड) येथील छत्रपती शाहू, फुले कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या दिव्याभारती चांगदेव लोढे हिने शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीकपाहणीसंदर्भात प्रत्यक्ष स्वरूपात मार्गदर्शन केले.
प्रारंभी ग्रामस्थांनी या कृषिकन्येचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. एस. आर. अडसूळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जे. नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या दिव्याभारती लोढे हिने शेतकऱ्यांना कृषिविषयी माहिती देऊन ई-पीकपाहणी कशी करावी, याबाबत माहिती दिली. यासाठी ॲपचा वापर कसा करावा, पिकांची नोंद कशी करावी याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष बांधावर जाऊन केले.
यावेळी माजी सरपंच रवींद्र लोढे, अंबादास लोढे, मच्छिंद्र आर्ले, माउली लोढे, हनुमान मगर, चांगदेव लोढे, कानिफ उकेदळ, आप्पासाहेब लोढे, गणेश लोढे, नवनाथ लोढे, आदिनाथ लोढे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
----
२३ मजलेशहर
मजलेशहर येथील शेतकऱ्यांना कृषिकन्या दिव्याभारती चांगदेव लोढे ई-पीकपाहणीसंदर्भात मार्गदर्शन केले.