शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामसभेत तीव्र पडसाद

By admin | Updated: June 2, 2014 00:36 IST

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील दरोडा प्रकरणातील हल्लेखोरांना न झालेली अटक व चोर्‍यांचे सत्र थांबविण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे तीव्र पडसाद रविवारी येथे आयोजित ग्रामसभेत उमटले.

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील दरोडा प्रकरणातील हल्लेखोरांना न झालेली अटक व चोर्‍यांचे सत्र थांबविण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे तीव्र पडसाद रविवारी येथे आयोजित ग्रामसभेत उमटले. यावेळी पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. दरोडा प्रकरणातील हल्लेखोरांना अटक न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी कर्जत पोलिसांनी चौदा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी केलेल्या या मुस्कटदाबीचे तीव्र पडसाद गावात उमटले. संतप्त ग्रामस्थ रविवारी सकाळी आठ वाजता जगदंबा मंदिरासमोर एकवटले. त्याचवेळी ध्वनीक्षेपकावरून तातडीची ग्रामसभा आयोजित करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले. सकाळी नऊ वाजता मंदिरासमोर कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांच्या उपस्थितीत ग्रामसभा भरविण्यात आली. दरोड्यातील आरोपी पकडण्याऐवजी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. सुरुवातीला माजी जि.प. सदस्य राजेंद्र गुंड यांनी कर्जत पोलिसांच्या कृत्याचा निषेध करणारा ठराव मांडला. सर्वानुमते हा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यामध्ये सुपेकर यांच्या हल्लेखोरांना शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास येत्या शनिवारी (७ जून) पुन्हा कुळधरण चौफुल्यावर रास्ता रोको आंदोलन व सोमवारी (९ जून) कर्जत पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचे सामूहिक उपोषण करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. बाळासाहेब पाटील यांनी कर्जत पोलिसांच्या तपास कामाबाबत नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला. (वार्ताहर) ‘लोकमत’चे अभिनंदन कुळधरण येथील दरोडा, चोर्‍या, रस्तालूट या घटनांची इत्यंभूत वृत्तमालिका छायाचित्रासह प्रसिद्ध करीत पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवणार्‍या ‘लोकमत’ च्या अभिनंदनाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला. बाळासाहेब हरिभाऊ सुपेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावास सर्वानुमते संमती देण्यात आली. गुन्हे दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यातील शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष अशोक जगताप, सेवा संस्थेचे संचालक मंगेश पाटील, उपसरपंच सतीश कळसकर, सुनील सुपेकर, मोहन सुपेकर, दत्ता कुलथे, कांतीलाल सुपेकर आदी आंदोलनकर्त्यांनी आपण जामीन घेणार नसल्याचे सभेत स्पष्ट केले. पोलिसांनी आम्हाला अटक करावी, मात्र पोलिसांनी आता गावाचे संरक्षण न केल्यास कायदा हातात घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. महिलाही एकवटल्या वस्तीवर राहणार्‍या सरपंच मीना गुंड यांच्या पतीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या अधिकच संतापल्या. नजीकच्या गुंड, वारे वस्ती शाळेच्या पडवीत सभा घेत महिलांनी पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी सविता सुपेकर, हेमलता जगताप, विमल गुंड, छाया आजबे, निर्मला आजबे व इतर मिळून चाळीस महिला उपस्थित होत्या.