ग्रामपंचायत निकालास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:35+5:302021-03-26T04:20:35+5:30
श्रीरामपूर : नुकत्याच पार पडलेल्या कारेगाव ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच सदोष असल्याचा आरोप करत पराभूत मंडळाने न्यायालयात याचिका दाखल ...

ग्रामपंचायत निकालास
श्रीरामपूर : नुकत्याच पार पडलेल्या कारेगाव ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच सदोष असल्याचा आरोप करत पराभूत मंडळाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत तहसीलदारांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
ही निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत पराभूत मंडळाचे शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे, योगेश उंडे यांच्यासह १३ उमेदवारांनी न्यायालयात निकालाला आव्हान दिले आहे. येथील दिवाणी न्यायालयात हा वाद चालणार आहे.
याचिकेत तहसीलदार व निवडणूक अधिकाऱ्यासह १६ उमेदवारांना प्रतिवाद केल्याचे पटारे यांनी सांगितले. असे एकूण १९ व्यक्तींना प्रतिवादी करण्यात आले आहे. मतदान सुरू असताना एका प्रभागातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होऊन मतदान प्रक्रिया बराच वेळ बंद पडली. मतदान केंद्रावर वयोवृद्ध, शारीरिक विकलांग मतदारांचे मतदान रक्तनाते संबंधित व्यक्तींनी न करता ठराविक लोकांनी अधिकार पत्राच्या बळावर केले, असे काही आक्षेप याचिकेत नोंदविण्यात आले आहेत.
ईव्हीएम मशीनवरील चष्मा, कपबशी, छत्री या चिन्हासमोरील बटन दबले गेले नाही. तक्रार करूनही दखल घेतली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पटारे यांनी म्हटले आहे. ॲड. बी. बी. मुठे हे याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहत आहेत.