शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्य दोनशे रुपयांचा धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST

धामोरी : पंचायतराज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना महिन्याला फक्त २०० रुपये मानधन मिळते. त्यामुळे ग्रामीण ...

धामोरी : पंचायतराज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना महिन्याला फक्त २०० रुपये मानधन मिळते. त्यामुळे ग्रामीण विकासात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींकडेच दुर्लक्ष होत आहे. अत्यल्प मानधनावर गावचा विकास कसा करणार, असा प्रश्न सदस्य व्यक्त करत आहेत.

महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य आणि सरपंच यांना महिन्यासाठी मानधन दिले जाते. काहींना बऱ्यापैकी पैसे मिळतात तर काहींना अगदी तुटपुंजी रक्कम मिळते. लोकसेवक म्हणून त्यांना मानधन दिले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी ग्रामीण भागाच्या विकासाची त्रिस्तरीय रचना आहे. ही व्यवस्था बहुतांशी प्रमाणात शासन निधीवर अवलंबून आहे. महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था शासन निधी बरोबरच स्थानिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून अधिक सक्षम झालेली आहे. या दोन्हीकडे स्वतःचा निधी आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कारभाऱ्यांना विकासासाठी किती निधी द्यायचा याचे प्रमाण ठरलेले आहे

गाव कारभाऱ्यांना मानधनासाठी ७५ टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीतून द्यायचे असते. उपसरपंच यांना मानधन मिळत नव्हते. ३० जुलै २०१९ ला घेण्यात आलेल्या एका निर्णयाने त्यांना मानधन सुरू करण्यात आले. त्याच आदेशानुसार सरपंचाचे मानधनातही वाढ करण्यात आली.

.......................

सरपंच, उपसरपंच, सदस्यांना असे मिळते मानधन

गावची लोकसंख्या दोन हजारापर्यंत आहे. अशा गावातील सरपंचाला तीन हजार रुपये मानधन तर, उपसरपंचाला एक हजार रुपये मानधन मिळते. लोकसंख्या दोन ते आठ हजाराच्या दरम्यान असल्यास सरपंचाला चार हजार रुपये, उपसरपंचाला दीड हजार रुपये मानधन मिळते तर, आठ हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचाला पाच हजार रुपये मानधन व उपसरपंचास दोन हजार रुपये मानधन मिळते. ग्रामपंचायत सदस्याला मासिक बैठकीचा केवळ दोनशे रुपये सदस्य भत्ता मिळतो. अशा अल्पशा मानधनावर गाव कारभारी गावचा कारभार चालवत असतात.