शासकीय कार्यालये रंगणार एकाच रंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:08+5:302020-12-25T04:17:08+5:30

कर्जत : कर्जत शहरातील सर्व शासकीय कार्यालये आता एकाच रंगात रंगणार असून, यासाठी कर्जत- जामखेड इंटिग्रेटेड फाउंडेशनच्या वतीने रंग ...

Government offices will be painted in the same color | शासकीय कार्यालये रंगणार एकाच रंगात

शासकीय कार्यालये रंगणार एकाच रंगात

कर्जत : कर्जत शहरातील सर्व शासकीय कार्यालये आता एकाच रंगात रंगणार असून, यासाठी कर्जत- जामखेड इंटिग्रेटेड फाउंडेशनच्या वतीने रंग उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयांचे रूपडे बदलण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असून, असा उपक्रम राबविणारा कर्जत हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे.

कर्जत शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांचे रूपडे बदलणार आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार विशेष लक्ष ठेवून आहेत. आमदार पवार यांच्या कर्जत- जामखेड इंटिग्रेटेड फाउंडेशनच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांना रंग पुरविण्यात येणार आहे. बुधवारी अभय सांस्कृतिक भवन याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात आमदार पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या हस्ते हा रंग सर्व शासकीय कार्यालयांना सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले. नितीन देशमुख यांनी मागील ८२ दिवस सुरू असलेल्या कामाचा आढावा मांडला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखताना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. सुनंदाताई पवार यांनी कर्जत तालुक्यात विविध सामाजिक संघटनांच्या कामाचे कौतुक करीत आगामी काळात काळात आपले शहर आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचे आहे, असे सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित निमकर, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, मनीषा सोनमाळी, बापूसाहेब नेटके, स्वाती पाटील, विशाल म्हेत्रे, भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरी आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी आभार मानले. अरुण पुरी यांनी सूत्रसंचालन केले.

............

फोटो २४ कर्जत रंग

- कर्जत येथील सर्व शासकीय कार्यालयांना एकसारखा रंग देण्यात येणार आहे. यासाठी रंग कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे सुपूर्द करताना सुनंदा पवार.

Web Title: Government offices will be painted in the same color