सायकलिंग करत असताना टेम्पोच्या धडकेत शासकीय ठेकेदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:35+5:302021-07-24T04:14:35+5:30

शुक्रवारी (दि. २३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास वांबोरी फाट्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर टेम्पो घटनास्थळी सोडून चालक पसार झाला. ...

Government contractor killed in tempo collision while cycling | सायकलिंग करत असताना टेम्पोच्या धडकेत शासकीय ठेकेदाराचा मृत्यू

सायकलिंग करत असताना टेम्पोच्या धडकेत शासकीय ठेकेदाराचा मृत्यू

शुक्रवारी (दि. २३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास वांबोरी फाट्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर टेम्पो घटनास्थळी सोडून चालक पसार झाला. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गडाख हे दररोज सायकलिंगसाठी जात होते. शुक्रवारी पहाटे ते नेहमीप्रमाणे नगर-औरंगाबाद रोडने मित्रासोबत सायकलिंगसाठी गेले होते. वांबोरी फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या मालवाहू टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विनीत पाउलबुद्धे, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनीही गडाख यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. अपघातानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेतला. गडाख यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

...................

फोटो २३ अश्विन गडाख

Web Title: Government contractor killed in tempo collision while cycling