गोशाळा आध्यात्मिक, वैज्ञानिक केंद्र बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:45+5:302021-07-26T04:21:45+5:30

नेवासा : येथे नव्याने सुरू केलेली कामधेनू गोशाळा आध्यात्मिक व वैज्ञानिक संशोधन केंद्र बनावे, अशी अपेक्षा गुरुवर्य भास्करगिरी महाराज ...

Goshala should become a spiritual, scientific center | गोशाळा आध्यात्मिक, वैज्ञानिक केंद्र बनावे

गोशाळा आध्यात्मिक, वैज्ञानिक केंद्र बनावे

नेवासा : येथे नव्याने सुरू केलेली कामधेनू गोशाळा आध्यात्मिक व वैज्ञानिक संशोधन केंद्र बनावे, अशी अपेक्षा गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली.

नेवासा येथे संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान, नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, समर्पण फाउंडेशन, मिशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कामधेनू गोशाळा भूमिपूजन व शाश्वत सेंद्रिय शेती प्रकल्पाचा प्रारंभ नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महंत उद्धव महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, ऋषीकेश महाराज, अंकुश महाराज, रामनाथ महाराज पवार उपस्थित होते.

भास्करगिरी महाराज म्हणाले, गोमातेची उपयुक्तता आध्यात्मिक व वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध होऊन तिचा जीवनात अंगीकार व वापर झाला तरच कत्तल थांबेल. ही गोशाळा केवळ गावाची नसून ती संपूर्ण तालुक्याची आहे. ती स्वयंपूर्ण व्हावी यासाठी समाजाने तन,मन, धनाने हातभार लावला पाहिजे.

यावेळी नगरसेवक सुनील वाघ, डॉ. लक्ष्मण खंडाळे, महेश नवले, नगरसेवक सचिन नागपुरे, श्रीनिवास रक्ताटे, सुनील मोरे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. भारत करडक, सूत्रसंचालन रणछोडदास जाधव यांनी केले. डॉ. करणसिंह घुले यांनी आभार मानले.

Web Title: Goshala should become a spiritual, scientific center