राहुरी येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच गेल्या चार महिन्यांमध्ये कडक कारवाई केली होती. त्यामध्ये दारू अड्ड्यांवर छापे, वाळू माफियांवर छापे टाकले. त्यांची बदली होऊ नये म्हणून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होत होती. सोमवारी अचानक पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक येथे बदली झाली. त्यामुळे राहुरी मध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यांची पुन्हा नव्याने राहुरी तालुक्यात बदली व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
..................
राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे रुजू झाल्यापासून तालुका हद्दीत गुन्हेगार तसेच अवैध व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दुधाळ हे एक खमके पोलीस अधिकारी असून ते लवकरच तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यशस्वी ठरतील, त्यामुळे त्यांची पुन्हा राहुरीत नियुक्ती करावी.
-शरद बाचकर