कान्हूर पठार जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:35+5:302021-07-27T04:21:35+5:30

कान्हूर पठार : कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्या. येथील विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल, असा विश्वास ...

Give Kanhur Plateau Zilla Parishad to NCP | कान्हूर पठार जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे द्या

कान्हूर पठार जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे द्या

कान्हूर पठार : कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्या. येथील विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल, असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.

वडगाव दर्या (ता. पारनेर) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. वडगाव दर्या गावातील रस्ता दहा लाख रुपये, तीर्थक्षेत्र बायपास रस्ता पंधरा लाख रुपये, दलित वस्तीअंतर्गत विहीर पाच लाख रुपये, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन लाख रुपये, सभामंडप फरशीसाठी तीन लाख रुपये, अंगणवाडी पंचाहत्तर हजार रुपये, या विविध विकासकामांंचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

लंके म्हणाले, कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्यास येथील सर्व विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. वडगाव दर्यागाव व देवस्थानाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी चंद्रभान ठुबे यांची वीजवितरण समिती अध्यक्षपदी, राहुल झावरे यांची आत्मा कमिटीच्या अध्यक्षपदी, ठकाराम लंके यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी, सुदाम पवार यांची कुकडी कालवा समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांंचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष जितेश सरडे, चंद्रभान ठुबे, राहुल झावरे, ठकाराम लंके, सुदाम पवार, बापू शिर्के, किरण ठुबे, दादाभाऊ कावरे, सचिन ठुबे, प्रसाद नवले, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पारधी, सचिव शरद गुंड, खजिनदार अशोक गावडे, सरपंच मीना गावडे, उपसरपंच दत्ता गुंड, प्रदीप गावडे, गणेश गुंड, सुरेश गुंड, किसन पारधी, संपत गुंड, योगेश कानडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Give Kanhur Plateau Zilla Parishad to NCP