स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्याचे पुढील शिक्षण मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:17+5:302021-07-23T04:14:17+5:30

अहमदनगर : नवनागापूर येथील चेतना कॉलनीमधील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार संदीप दहातोंडे याने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात ...

Further education of students of Swami Vivekananda Vidyalaya is free | स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्याचे पुढील शिक्षण मोफत

स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्याचे पुढील शिक्षण मोफत

अहमदनगर : नवनागापूर येथील चेतना कॉलनीमधील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार संदीप दहातोंडे याने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक पटकावला असून, तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे त्याचे पुढील सर्व शिक्षण मोफत होणार आहे, अशी माहिती नवनागापूरचे सरपंच व विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. बबनराव डोंगरे यांनी दिली.

गुरुवारी (दि. २२) स्वामी विवेकानंद विद्यालयात सरपंच डॉ. डाेंगरे यांच्या हस्ते ओंकार दहातोंडे याच्यासह दहावीतील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रफुल्ल दहातोंडे याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर सिद्धी बोरुडे व नागेश काळे याने ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय व दिव्या गागरे हिने ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माता पालक मनीषा दहातोंडे, छाया गागरे या उपस्थित होत्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सत्यभामा शिंदे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन अनिता पिंपळे यांनी केले. आभार मनीषा ठाणगे यांनी मानले.

..................

स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावीत असताना ओंकार दहातोंडे याने राष्ट्रीय प्रज्ञाशोधची पहिली परीक्षा दिली होती. त्यानंतर अकरावीत असताना त्याने दुसरी परीक्षा दिली. या दोन्हीही परीक्षा त्याने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या. १९५ पैकी त्याला १११ गुण मिळाले. त्यामुळे त्याला आता पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ओंकार दहातोंडे याने सातवा क्रमांक मिळविला होता.

...........

२२ नवनागापूर१

Web Title: Further education of students of Swami Vivekananda Vidyalaya is free