६१ महिलांना शिलाई मशीनचे मोफत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:36+5:302021-08-19T04:25:36+5:30

याप्रसंगी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय येथे इस्रो प्रकल्पाच्या ई-लर्निंग सुविधेसाठी स्मार्ट टीव्ही ...

Free distribution of sewing machines to 61 women | ६१ महिलांना शिलाई मशीनचे मोफत वितरण

६१ महिलांना शिलाई मशीनचे मोफत वितरण

याप्रसंगी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय येथे इस्रो प्रकल्पाच्या ई-लर्निंग सुविधेसाठी स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. संगमनेर तालुक्यातील ५३, अकोले तालुक्यातील सहा आणि श्रीरामपूर, पारनेर येथील प्रत्येकी एका महिला अशा एकूण ६१ महिलांना शिलाई मशीनचे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या ४६ दात्यांचा सन्मान करण्यात आला. शिला करंजेकर तसेच सर्व महिलांनी शिलाईचे प्रशिक्षण देणाऱ्या रेणुका गुरव यांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन संजय कर्पे, सम्राट तवरेज व डॉ. सागर गोपाळे यांनी केले. रोटरी क्लब संगमनेरचे उपाध्यक्ष महेश वाकचौरे यांनी आभार केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खजिनदार मयूर मेहता, दीपक मणियार, अण्णासाहेब शेलकर, मोहित मंडलिक, अजित मंडलिक यांसह सर्वच रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Free distribution of sewing machines to 61 women