शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने केले उड्डाणपुलाचे नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST

अहमदनगर : शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ...

अहमदनगर : शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी उड्डाणपुलाचे नामकरण केले आहे. ‘ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल ’ असा फलक लावण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यास सर्वांचीच संमती असणार आहे. मात्र राष्ट्रवादीकडून नामकरणाची घाई कशासाठी? अशी चर्चा आता रंगली आहे.

नगर शहरातील जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उड्डणपुलाच्या नामकरण फलकाचे अनावरण करुन नारळ फोडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, सागर गुंजाळ, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, भरत गारूडकर, अमोल कांडेकर, राजेंद्र भालेराव, निलेश इंगळे, वैभव म्हस्के, शहानवाझ शेख, सुफियान शेख, वसीम शेख, मिजान कुरेशी, संतोष हजारे, अजय गुंड पाटील, जाकीर शेख, हाफिज शेख, शाहरुख शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत उड्डाणपुलाच्या खांबांना नामकरणाचे पत्रके चिकटविण्यात आली. यापूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपुलास शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपुलाचे जाहीर नामकरण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान उड्डाणपुलासाठी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली. उड्डाणपुलाचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रयत्न करून पुलाचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. गत महिन्यात सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी पुलावरून एकत्र फोटोसेशन केले होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे लोकार्पण, नामकरण आदी कार्यक्रमांना आता ही दोन्ही नेते एकत्र असतील, असा कयास बांधला जात होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या अचानक झालेल्या कृतीमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याला सर्वांचीच संमती राहणार आहे. मात्र नामकरणाची ही घाई कशासाठी? अशा प्रश्न नगरमध्ये उपस्थित झाला आहे.

---------

उड्डाणपुलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला सदर विभागाने उत्तर न दिल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे नामकरण करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्याला विनाविलंब मंजुरी देण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने ही कृती करण्यात आली.

-प्रा. माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

----------

फोटो- ०७ एनसीपी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी नगर येथील उड्डाणपुलाचे नामकरण केले. यावेळी प्रा. माणिक विधाते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. (छायाचित्र- साजिद शेख)