शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत जुन्या अभिलेख कक्षाला लागलेल्या आगीत जप्त दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:17 IST

पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुन्या अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने भस्मसात झाली. रविवारी (दि. १५) पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्देशासकीय भूखंडावर अतिक्रमणे

पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुन्या अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने भस्मसात झाली. रविवारी (दि. १५) पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आवारात असलेल्या जुन्या अभिलेख कक्षाच्या खोलीतील अभिलेखाला ही आग लागली. रात्रपाळीच्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ ही बाब पालिकेच्या अग्निशामक दलाला कळवली, परंतु अग्निशामक गाडी घटनास्थळी उशिराने आली. तोपर्यंत अभिलेख कक्षातील जुन्या शिधापत्रिकेचे फॉर्म, शासकीय कागदपत्रे तसेच शेजारी पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालातील काही दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला सूचना दिल्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांसह पोलीस कर्मचा-यांनी मदत केली.
शासकीय भूखंडावर अतिक्रमणे
पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या व शासकीय धान्य गोदामाला लागून असलेल्या जुन्या अभिलेख कक्षात विजेचे कनेक्शन नाही. परंतु जुना अभिलेख कक्ष व चौकीदार खोली पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या गर्दीत समोरून निदर्शनास येत नाही. तहसील कार्यालयाच्या समोरील शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून टप-या थाटल्याने तहसील कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी