दीड महिन्यात वाहनांवर साडेसात लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:54+5:302021-08-26T04:23:54+5:30

श्रीरामपूर : श्रीरामपूर पोलिसांनी बेशिस्त प्रवासी वाहनचालकांवर कारवाई करून ई-चलनाद्वारे ५४ दिवसांमध्ये साडेसात लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे. ...

A fine of Rs 7.5 lakh on vehicles in a month and a half | दीड महिन्यात वाहनांवर साडेसात लाखांचा दंड

दीड महिन्यात वाहनांवर साडेसात लाखांचा दंड

श्रीरामपूर : श्रीरामपूर पोलिसांनी बेशिस्त प्रवासी वाहनचालकांवर कारवाई करून ई-चलनाद्वारे ५४ दिवसांमध्ये साडेसात लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे. जिल्ह्यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या कामगिरीत अव्वल ठरले आहे.

शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी १ जुलै ते २३ ऑगस्ट या दरम्यान हजारो वाहनांवर कारवाया केली आहे. वाहनांची कागदपत्रे न बाळगणे, परवाना नसणे, नंबर प्लेटवर नावे टाकणे, सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये वाहने लावणे, मास्क न वापरणे आदी कारणांवरून हा दंड ठोठावण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मात्र कमी दंड वसूल झाला आहे.

--------

ई-चलनाद्वारे झालेला दंड

२४०८ वाहने : पाच लाख २० हजार दंड

ऑगस्टमधील कारवाया

९२० वाहने : दोन लाख ३७ हजार दंड

----------

दंडाची थकबाकी वाढली

वाहनांची नोंदणी करताना अनेक वाहनचालक वेगळा मोबाइल नंबर देतात. सध्या वापरात असलेला नंबर मात्र वेगळा असतो. अशावेळी त्यांना ई-चलन भेटतच नाही. त्यामुळे हा दंड साचत आहे.

-----------

कसे फाडले जाते ई-चलन

ई-चलन फाडताना वाहनांचा क्रमांक, मोबाइल नंबर, दंडाचे कारण यांचा उल्लेख करून ते भरले जाते. त्याची नोंद थेट मुंबई येथील कार्यालयात केली जाते. एकदा ई-चलन फाडल्यानंतर त्यात पुन्हा दुरुस्ती करता येत नाही.

----------

दहावेळा कारवाईची तरतूद

वाहनांवर जास्तीत जास्त दहा वेळी कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून वाहनचालकाला न्यायालयाकडून रितसर नोटीस बजावली जाते. त्यामुळे वाहनचालक स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन दंड भरतात.

- सोमनाथ गाडेकर, वाहतूक विभाग, शहर पोलीस ठाणे, श्रीरामपूर

--------

Web Title: A fine of Rs 7.5 lakh on vehicles in a month and a half