मनमाड रोडवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:26+5:302021-09-21T04:23:26+5:30

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून ते तातडीने बुजवावेत, अन्यथा आठ दिवसांनंतर मोठे आंदोलन केले जाईल, असा ...

Fill the potholes on Manmad Road immediately | मनमाड रोडवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवा

मनमाड रोडवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवा

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून ते तातडीने बुजवावेत, अन्यथा आठ दिवसांनंतर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निखिल शेलार, रोहिदास कर्डिले, शरद पवार, प्रकाश पोटे, अमित गांधी, चंद्रकांत पवार, दीपक गुगळे, गणेश निमसे, शहनवाज शेख, शहाबाज शेख आदींसह राष्ट्रवादीचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, नगर-मनमाड महामार्गावर नगरपासून राहुरीपर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत. यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी याच रोडवरील खड्डे बुजवले गेले होते, परंतु अवघ्या २ ते ३ पावसांत रस्त्याची दुरवस्था झाली. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे दुरुस्तीचे काम चांगले होईल, अशी आशा आहे, परंतु आठ दिवसांच्या आत खड्डे व्यवस्थित बुजवले नाही तर राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर २६ सप्टेंबरनंतर कधीही तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल.

-----------

फोटो - २०पोटे निवेदन

नगर-मनमाड महामार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याच्या मागणीचे निवेदन नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

Web Title: Fill the potholes on Manmad Road immediately