दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:58+5:302021-02-05T06:28:58+5:30

संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी यांच्या ...

The filed offense should be withdrawn | दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा

दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा

संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची कोणतीही चूक अथवा गुन्हा केला नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा व त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे. आकस बुध्दीने संस्थानच्या या अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे, तरी दखल केलेली खोटी फिर्याद मागे घेण्यासाठी आदेश देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरीश दिमोटे, ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, नितीन मिराणे, मनोज गाडेकर, प्रशांत शर्मा, सुनील दवंगे, राजकुमार जाधव, किशोर पाटणी, रवींद्र महाले, हेमंत शेजवळ, सचिन बनसोडे, किरण सोनवणे, मोबीन खान उपस्थित होते.

Web Title: The filed offense should be withdrawn