शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

निमलष्करी दलाच्या दहा तुकड्या दाखल

By admin | Updated: October 11, 2014 00:10 IST

अहमदनगर : केंद्रीय निमलष्करी दलाच्या (सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस) दहा तुकड्या नगरमध्ये दाखल झाल्या आहेत.

अहमदनगर : केंद्रीय निमलष्करी दलाच्या (सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस) दहा तुकड्या नगरमध्ये दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये शंभर ते सव्वाशे जवान असणार आहेत. जिल्ह्यातील पोलिसांव्यतिरिक्त तब्बल अडिच हजार पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने तो नगरमध्ये दाखल होणार आहे. प्रत्येक मतदार संघासाठी एक उपअधीक्षक नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी परराज्यातील पोलीस बळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. यंदा प्रथमच केंद्राचे निमलष्करी दलाला मोठ्या संख्येने पाचारण करण्यात आले आहे. गतवर्षी निमलष्करी दलाच्या चार तुकड्या जिल्ह्यात आल्या होत्या. यंदा तब्बल दहा तुकड्या नगरमध्ये दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये शंभर ते सव्वाशे जवान आहेत. ते जवान कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई करतील. याशिवाय होमगार्ड, महिला पोलीस, राज्य राखीव दलाचे जवान, फ्लायिंग स्कॉड आदी बळ तैनात करण्यात येणार आहे. निमलष्करी दलाच्या एकूण १२ तुकड्या मंजूर झाल्या आहेत, त्यापैकी १० तुकड्या दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये १०० ते ११० पोलीस कर्मचारी असल्याने सुमारे दीड हजार पोलीस बंदोबस्तासाठी मिळणार आहेत, असे गौतम यांनी सांगितले.पोलीस आयुक्त नसलेला आणि सर्वाधिक मतदारसंघ असलेला अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे. तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा असल्याने अतिरिक्त पोलीस बळाची मागणी करण्यात आली होती. ती सर्व मागणी मंजूर झाल्याचे गौतम यांनी सांगितले.(प्रतिनिधी)