तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST2021-02-12T04:19:07+5:302021-02-12T04:19:07+5:30

कोपरगाव : नाशिक येथे होणाऱ्या ३१ व्या वरिष्ठ गट राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात अहमदनगर ...

Fencing Selection Test Competition | तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा

तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा

कोपरगाव : नाशिक येथे होणाऱ्या ३१ व्या वरिष्ठ गट राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्यावतीने वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच झाली.

या निवड चाचणी स्पर्धेत कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, के. बी. रोहमारे जुनिअर कॉलेज, संजीवनी अभियांत्रिकी विद्यालय, एस. एस. जी. एम. कॉलेज यासह श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेज, अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे २५ पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये १० मुलींचा समावेश होता. स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप घोडके यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले. याप्रसंगी सचिव संदेश भागवत, सुनील गोडळकर, शिवप्रसाद घोडके, प्रा. आकाश लकारे, दिलीप तुपसैंदर, निलेश बडजाते, अनिल काले आदी क्रीडा प्रशिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Fencing Selection Test Competition