लसीकरण केंद्रावरील वशिलेबाजी थांबविण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:18+5:302021-08-26T04:23:18+5:30

काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावरील वशिलेबाजी तातडीने थांबवा आणि काष्टी गावातील नागरिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात ...

Fasting to stop vaccination at the vaccination center | लसीकरण केंद्रावरील वशिलेबाजी थांबविण्यासाठी उपोषण

लसीकरण केंद्रावरील वशिलेबाजी थांबविण्यासाठी उपोषण

काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावरील वशिलेबाजी तातडीने थांबवा आणि काष्टी गावातील नागरिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी तरुणाईने बुधवारी एकदिवसीय उपोषण केले. या माध्यमातून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

नागवडे साखर कारखान्याचे राकेश पाचपुते, ज्ञानेश्वर पाचपुते, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते, संजय काळे, शशिकांत जाधव, मदन भोसले, राहुल पाचपुते, श्रीकांत पाचपुते, राजेंद्र नीळकंठ नागवडे आदींनी उपोषणात सहभाग घेतला.

माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ॲड. विठ्ठलराव काकडे, गटविकास अधिकारी राम जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

काष्टी गावची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास आहे. कोरोना प्रतिबंधक लस अवघ्या तीन हजार नागरिकांना देण्यात आली आहे. इतर गावांच्या तुलनेत काष्टी गाव लसीकरणात मागे आहे. त्यातच येथे वशिलेबाजी होत असल्याने सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. काष्टी गावासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे स्वतंत्र शिबिर आयोजित करावे, टोकन सिस्टमनुसार लस देण्यात यावी, अशी मागणी राकेश पाचपुते यांनी केली.

नितीन खामकर म्हणाले, आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार कारवाई केली जाईल. काष्टीकरांसाठी लसीकरणाचे स्वतंत्र शिबिर आयोजित करून न्याय दिला जाईल. त्यानंतर घनश्याम शेलार व गटविकास अधिकारी राम जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.

----

फोटो आहे

Web Title: Fasting to stop vaccination at the vaccination center