श्रावणातला उपवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:20+5:302021-08-25T04:27:20+5:30

अहमदनगर : श्रावणमास सुरू होऊन पंधरा दिवस उलटले आहेत. या महिन्यात उपवासांची रेलचेल असल्याने उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. ...

Fasting in Shravan is expensive | श्रावणातला उपवास महागला

श्रावणातला उपवास महागला

अहमदनगर : श्रावणमास सुरू होऊन पंधरा दिवस उलटले आहेत. या महिन्यात उपवासांची रेलचेल असल्याने उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे साबुदाणा, शेंगदाणे, भगर, गूळ, पेंड खजुरीच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदाचा श्रावणातील उपवास करणेही महागात असल्याचे दिसून आले आहे.

श्रावण महिना हा भक्ती, उपासना आणि उपवासाचा मानला जातो. प्रत्येक वार हा उपवासाचा असतो. काहींना महिनाभर तर काहींना एक दिवसाआड तरी उपवास असतो. शनिवार, सोमवार हे उपवासाचे दिवस बहुतांश लोकांना असतात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी आहे.

साबुदाणा आणि शेंगदाण्याचा दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. साबुदाण्याला मोठी मागणी आहे. गुळाचीही मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे.

-----

असे वाढले दर

आधीचे सध्याचे

साबुदाणा ६० ६४

शेंगदाणे १२० १२४

----------

भगरीचे दर स्थिर

भगरीलाही मोठी मागणी आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून साबुदाणा आणि भगरीच्या दरात स्थिरता आहे. सध्या भगर १४० रुपये किलो आहे. साबुदाण्याचे दरही स्थिर आहेत. दर्जाप्रमाणे ६० ते ६४ रुपये किलो असा दर आहे.

-------------

गेल्या दीड महिन्यापासून साबुदाणा व भगरीचे दर स्थिर आहेत. श्रावणात मोठी मागणी असली तरी साबुदाणा आणि भगरीच्या दरात वाढ झाली नाही हे विशेष आहे. शेंगदाण्याच्या दरात मात्र वाढ झालेली आहे. दोन महिन्यावर दिवाळी आल्याने शेंगदाण्याच्या दरात सतत वाढ होत राहण्याची शक्यता आहे.

-संजय साखरे, दुकानदार

-------------

सध्या श्रावणामास असल्याने उपवासाच्या पदार्थांना मागणी आहे. गूळ, पेंडखजुरांची ग्राहकांकडून मागणी असते. याशिवाय साबुदाणा आणि शेंगदाण्यालाही मोठी मागणी आहे.

- सागर धावडे, व्यापारी

---

डमी क्रमांक- १०९०

Web Title: Fasting in Shravan is expensive