शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST

उक्कलगाव : दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शेतकरी चिंतातुर असताना वाळूमाफिया मात्र बिनधास्तपणे वावरत ...

उक्कलगाव : दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शेतकरी चिंतातुर असताना वाळूमाफिया मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत, अशी टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. गळनिंब येथे ३३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्यामराव चिंधे होते.

विखे म्हणाले, शेतमालाला सरकार भाव देऊ शकले नसल्याने उत्पादित माल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. परंतु सरकारला त्याची कुठलीही जाणीव नाही. गावपातळीवर आता युवकांनाच शेती आणि दुग्ध व्यवसायात एकत्रित येऊन काम करावे लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सामान्य माणसाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांपासून हे सरकार दूर गेले असल्याची टीकाही त्यांनी केली. बेसुमार वाळू उपशाने पर्यावरणाबरोबरच आता सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात कोल्हार ते बेलापूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाल्यामुळेच या रस्त्याची दुर्दशा झाली. गळनिंब येथे प्रवरा सहकारी बँकेचा विस्तार कक्ष सुरू करण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे याप्रसंगी विखेंनी सांगितले. गळनिंब येथील सिद्धेश्वर देवस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही विखे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सभापती संगीता शिंदे, माजी सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, पंचायत समिती सदस्या कल्याणी कानडे, प्रवरा बॅंकेचे संचालक हनुमान चिंधे, चांगदेव भागवत, रामदास देठे, संपतराव चितळकर आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनाकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्यसेविकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच शिवाजी चिंधे, उपसरपंच कविता भोसले, अनिता शेरमाळे, सुलोचना मारकड, दत्तात्रय माळी, बाळासाहेब वडितके, संजय शिंदे, अनिल चिंधे, शंकर वरखड, सोमनाथ चिंधे, अण्णासाहेब शिंदे, गोपीनाथ जाटे, बाळासाहेब पारखे, जनार्दन घोरपडे, गणपत चिंधे, रंगनाथ शिंदे, तान्हाजी देठे, डाॅ. सुनील चिंधे, मुख्याध्यापक अशोक नान्नोर उपस्थित होते.

----