कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:21+5:302021-08-27T04:25:21+5:30

पोटफोडे यांच्यावर सहकारी बँक व सोसायटीचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे आलेली आर्थिक टंचाई, ...

Farmer commits suicide due to debt | कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पोटफोडे यांच्यावर सहकारी बँक व सोसायटीचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे आलेली आर्थिक टंचाई, शेतीचे नुकसान यामुळे बँक कर्ज कसे फेडावे या विचाराने ते त्रस्त होते. त्यात हाताला काम नाही. शेतीत उत्पन्न होत नाही. मोठ्या प्रमाणात झालेली भाववाढ त्यामुळे ते सतत चिंतेत होते. आता जगणे अशक्य असल्याची निराशा ते घरात व्यक्त करीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना वारंवार धीर देण्याचा प्रयत्न केला होता. कर्जाच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, जावई असा मोठा परिवार असून याबाबत शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण टेकाळे हे करीत आहेत.

Web Title: Farmer commits suicide due to debt