अनुदानित बियाण्यांच्या नोंदणीला २० मे पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:44+5:302021-05-15T04:19:44+5:30

अहमदनगर : खरीप हंगामासाठी शासनाकडून अनुदानावर बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असून, ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत २० मे पर्यंत वाढविण्यात ...

Extension of registration of subsidized seeds till 20th May | अनुदानित बियाण्यांच्या नोंदणीला २० मे पर्यंत मुदतवाढ

अनुदानित बियाण्यांच्या नोंदणीला २० मे पर्यंत मुदतवाढ

अहमदनगर : खरीप हंगामासाठी शासनाकडून अनुदानावर बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असून, ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत २० मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

शासकीय अनुदानावर खरीप हंगामासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १५ मेपर्यंत मुदत होती. त्यात वाढ करण्यात आली असून, २० मेपर्यंत शेतकरी अर्ज दाखल करू शकतात. अनुदानावर खरिपासाठी तूर, बाजरी, मका, सोयाबीन, नाचणी, मूग, उडीद, साेयाबीन बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. परंतु, त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करणे बंधनकारक असून, अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांना नाममात्र दरात बियाणे मिळणार आहेत.

.....

जिल्ह्याला उद्दिष्ट

तूर- ७७ क्विंटल

मका-२१३

बाजरी- ३९६

नाचणी- १

मूग-३६०

उडीद- ७४

सोयाबीन- ७५०

.....

आवश्यक कागदपत्रे

- आधारकार्ड, सातबारा, उतारा, ८ अ

- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक

- ओटीपीसाठी मोबाइल आवश्यक

-अंगठा स्कॅनसाठी शेतकरी स्वत: हजर असावा

....

तूर, मूग, उडीद बियाण्यांची ४ किलोची किट मिळणार

कृषी विभागाने अनुदानित बियाण्यांशिवाय आता तूर, मूग आणि उडीदच्या बियाण्यांची ४ किलोच्या किटचा नव्याने समावेश केला आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत येत्या २० मे पर्यंत आहे.

...

पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज मागविले

कृषी विभागाकडून पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांची निवड केली जाते. त्यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले असून, अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Extension of registration of subsidized seeds till 20th May