शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस परतल्याने श्रावणी पोळ्याला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

केडगाव : कोरोनामुळे गावात अनेक घरात दुर्घटना घडल्या. आजही कोरोनाची भीती संपलेली नाही. शेतीचे गणितही बिघडून गेले. पावसाने उशिरा ...

केडगाव : कोरोनामुळे गावात अनेक घरात दुर्घटना घडल्या. आजही कोरोनाची भीती संपलेली नाही. शेतीचे गणितही बिघडून गेले. पावसाने उशिरा का होईना दर्शन दिले. त्यामुळे श्रावणी पोळ्यासाठी शेत शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

शेतकी कितीही संकटात असला तरी चालत आलेल्या रूढी, परंपरा एकदम तोडत नाही. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा-राजाचं आजच्या पोळ्यानिमित्त उतराई व्हावचं लागतं. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर साकत (ता.नगर) येथील शेतकरी मोहन विष्णू वाघमोडे यांनी दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया बळीराजा आणि लाडक्या सर्जा-राजाचं अतूट नातं व्यक्त करण्यास पुरेशी आहे.

ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचे सावट कायम आहे. त्यातच पावसाने दडी मारली. मोठ्या अवधीनंतर नगर तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसाच्या काळजीत असणारा बळीराजा काही प्रमाणात सुखावला. त्यामुळे घरातील दु:ख बाजूला सारत शेतकरी आपल्या सर्जा-राजाच्या सणासाठी सज्ज झाला आहे. सकाळपासूनच लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यास सुरुवात झाली आहे. गुंडेगाव येथे बैलपोळ्याची जय्यत तयारी पहायला मिळत आहे. पाऊस न पडल्याने शेतकरी राजा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे. आता पिके जगतील. गुंडेगाव, वाळकी, रूई, चिंचोडी पाटील, जेऊर, देहरे या व इतर गावातील बाजारपेठात बैलाचा साज खरेदीसाठी दुकानांमध्ये बळीराजाने गर्दी केली होती.

ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनविलेल्या बैलाची पूजा करतात. आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे शेतकरी बैलांना सजावट करतात. दुपारी पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. गावातून संध्याकाळी मिरवणूकही काढली जाते.

---

वर्षभर शेतात काम करणाऱ्या सर्जा-राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्याला आहे. शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. बैलांना सजवून वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. त्याचा परिणाम बैलपोळा सण साजरा करण्यावर दिसून येणार असल्याचे चित्र आहे.

-संतोष भापकर,

उपसंरपच, गुंडेगाव

----

चालू वर्षी सुरुवातीला पावसाने पाठ फिरविल्याने शेतीमधील उत्पन्न शेतकऱ्याच्या हातात आले नाही. मूग, बाजरी सोयाबीनच्या उत्पन्नात ६० ते ७० टक्के घट निर्माण झाली. शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा होईल.

-कारभारी कर्डिले,

शेतकरी, मजले चिंचोली

------

०५ नगर पोळा

गुंडेगाव येथे पोळ्यानिमित्त बैलांना सजविण्यासाठी विविध साज यांची खरेदी करताना शेतकरी.