प्रत्येकाने हेल्मेट, मास्कचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:32+5:302021-07-26T04:21:32+5:30
जवळे : प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच कोरोनामुळे सर्वांनी तोंडाला मास्क वापरणेही गरजेेचे ...

प्रत्येकाने हेल्मेट, मास्कचा वापर करावा
जवळे : प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच कोरोनामुळे सर्वांनी तोंडाला मास्क वापरणेही गरजेेचे आहे, असे आवाहन प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केले.
पारनेर येथे राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हेल्मेट, मास्क वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव विश्वास आरोटे अध्यक्षस्थानी होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, प्राचार्य डॉ. रंगनाथ अहिरे, यावेळी पत्रकार दत्ता पाचपुते, भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र बोडके, दत्ता गाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एकनाथ भालेकर, शिरीष शेलार, सदानंद सोनावळे, रामदास नरड, बाबाजी वाघमारे, सागर आत्तार, ज्ञानेश्वर लोंढे, अविनाश भामरे, संतोष चोगले, गंगाधर धावडे, आनंद भुकन, सुधीर पठारे, विजय रासकर, राम तांबे, संजय मोरे, नीलेश जाधव, चंद्रकांत कदम, भगवान श्रीमंदिलकर, किरण थोरात, अभिजित कपाळे, नीलेश शेंडगे, संपत कपाळे, पोपट पायमोडे, संपत वैरागर आदी उपस्थित होते.