प्रसाद शुगरमध्ये लवकरच इथेनॉल प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:09+5:302021-09-21T04:23:09+5:30
प्रारंभी बाफना यांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चीफ जनरल मॅनेजर विकास आभाळे, वर्कर्स मॅनेजर संजय ...

प्रसाद शुगरमध्ये लवकरच इथेनॉल प्रकल्प
प्रारंभी बाफना यांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चीफ जनरल मॅनेजर विकास आभाळे, वर्कर्स मॅनेजर संजय मस्के, जनरल मॅनेजर अर्जुन माने, शेतकरी अधिकारी सुदाम घुगरकर, सिव्हिल इंजिनीअर महेश गायकवाड, एचआर मॅनेजर शैलेंद्र काळे, स्टोअरकीपर बाबासाहेब कल्हापुरे, बबन पागीरे, प्रवीण वाघमारे उपस्थित होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख म्हणाले, प्रसाद शुगर कारखान्याने आधुनिक मशिनरी बसविली आहे. प्रतिदिनी पाच हजार मेट्रिक टन ऊसपुरवठा करणारी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे रोज कारखाना ४ हजार ५०० मेट्रिक टन प्रतिदिवसाप्रमाणे गाळप करणे शक्य होणार आहे. या गळीत हंगामासाठी प्रसाद शुगरकडे अकरा हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. यामधून अंदाजे आठ ते नऊ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. या गाळप हंगामात प्रसाद शुगरने आठ लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
.....
फोटो