शिर्डीत प्रत्येक प्रभागात खुल्या व्यायामशाळांची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:53+5:302021-09-25T04:20:53+5:30
नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर : नागरीकांच्या आरोग्यासाठी नगरपंचायतचा पुढाकार शिर्डी : शिर्डीतील तरुणाईबरोबरच प्रौढ नागरिकांच्या आरोग्यासाठी शहराच्या जवळपास प्रत्येक प्रभागात ...

शिर्डीत प्रत्येक प्रभागात खुल्या व्यायामशाळांची उभारणी
नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर : नागरीकांच्या आरोग्यासाठी नगरपंचायतचा पुढाकार
शिर्डी : शिर्डीतील तरुणाईबरोबरच प्रौढ नागरिकांच्या आरोग्यासाठी शहराच्या जवळपास प्रत्येक प्रभागात खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येत आहेत. दहा प्रभागात खुल्या व्यायामशाळा उभारण्यात आल्या असून, अन्य पाच ठिकाणीही ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांनी दिली.
शहरातील रस्ते, वीज, पाणी, गटार आदी मूलभूत प्रश्न मार्गी लागल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांनी शहर सौंदर्यीकरण व अन्य नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच शहरातील रस्त्यांच्या कडेला, ओपनस्पेस, हाउसिंग सोसायट्या व नागरी वस्तीलगत या खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येत आहेत. या खुल्या व्यायामशाळेत स्काय वॉकर, स्पीनर टू व्हीलर, डबल सीट ऑफ बोर्ड, एअर वॉकर व शोल्डर बिल्डर ही उपकरणे बसवण्यात आली आहेत. सध्या लक्ष्मीनगर, प्रभाग क्रमांक दोन मध्ये अठरा मीटर रस्त्यालगत, सिल्व्हर ओक प्लॅटिनम कॉलनी, सिल्व्हर ग्रीन व्ह्यू कॉलनी, अशोक गोंदकर यांच्या घराजवळ, गायकवाड वस्तीशेजारी असलेल्या पंधरा मीटर रस्त्यालगत, प्रभाग क्रमांक दहामधील नाना-नानी पार्कमध्ये, नाला रस्त्यालगत, ताराबाई चांगदेव गोंदकर यांच्या ओपन स्पेसमध्ये तसेच मेघा धर्मशाळेच्या ओपन स्पेसमध्ये या दहा खुल्या व्यायामशाळा उभारण्यात आल्या असून, त्यासाठी जवळपास तेहतीस लक्ष रुपये खर्च आला असल्याचे नगराध्यक्ष गोंदकर यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध प्रभागात जागेच्या उपलब्धतेनुसार आणखी पाच खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असून, या खुल्या व्यायामशाळेचा लाभ अनेक नागरिक घेत आहेत.