संघटित युवाशक्तीच्या योगदानातून पर्यावरण संवर्धन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:30+5:302021-07-27T04:21:30+5:30

१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी आयोजित ‘एक पौधा एक संकल्प’ अभियानांतर्गत अहमदनगर कॉलेज व बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर रोडवरील ...

Environmental conservation is possible through the contribution of organized youth | संघटित युवाशक्तीच्या योगदानातून पर्यावरण संवर्धन शक्य

संघटित युवाशक्तीच्या योगदानातून पर्यावरण संवर्धन शक्य

१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी आयोजित ‘एक पौधा एक संकल्प’ अभियानांतर्गत अहमदनगर कॉलेज व बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर रोडवरील भिंगार नाला परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल जीवन झेंडे उपस्थित होते. झेंडे म्हणाले, आपण सर्वांत घाण ठिकाणी असलो तरी त्याचे एका सुंदर जंगलात रूपांतर करण्याची क्षमता आपल्यात हवी. १७ महाराष्ट्र एनसीसी बटालियन व एनसीसी युुनिट अहमदनगर कॉलेजने हा परिसर दत्तक घेऊन येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून परिसर सुंदर करावा.

अहमदनगर कॉलेजच्या ८५ एनसीसी छात्रांनी भिंगार नाल्याच्या दोन्ही बाजूंनी एकूण १०० वृक्ष व कॉलेज परिसरात ७० विविध प्रकारची रोपे लावली. या अभियानांतर्गत जिल्ह्यात बटालियनच्या वतीने एकूण १४०० रोपांची लागवड केली जाणार आहे.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी उपक्रमात सहभागी सर्व एनसीसी छात्रांचे कौतुक केले. कार्यक्रमास कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. बी. एम. गायकर, डॉ. सय्यद रझाक, आयक्यूएसी समन्वयक डॉ. पी. सी. बेदरकार, लेफ्टनंट डॉ. एम. एस. जाधव व बटालियनमधील सुभेदार कुंदन, शहाजी जाधव, नायब सुभेदार सुशील चंद्रा व लुईस उपस्थित होते.

--------

फोटो -२६नगर काॅलेज

अहमदनगर महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी भिंगार नाला परिसरात स्वच्छता करत वृक्षारोपण केले.

Web Title: Environmental conservation is possible through the contribution of organized youth