शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नगर अर्बन बँकेत अपहार; तीन डॉक्टरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 08:36 IST

डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील ६ कोटी ४ लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात समोर आले.

ठळक मुद्देडॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील ६ कोटी ४ लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री नगरमधील ३ डॉक्टरांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील ६ कोटी ४ लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात समोर आले. २२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारीरोजी कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र तांबिले, अभिजित घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी नगर येथील आशुतोष लांडगे याच्यासह इतर आठ जणांना अटक केली. दरम्यान, लांडगे याच्या खात्यावर अपहारातील ११ कोटी वर्ग झाल्याचे समोर आले. तसेच तिघा डॉक्टरांच्या खात्यावरही पैसे वर्ग झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या डॉक्टरांना अटक केली. या डॉक्टरांच्या खात्यावर अपहारातील रक्कम का वर्ग झाली, त्यांचा या अपहारात काही सहभाग आहे का, आदींबाबत पुढील चौकशी करणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी