पारनेर कारखान्याच्या खरेदीची ईडीकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:16+5:302021-09-24T04:25:16+5:30

पारनेर : पारनेर साखर कारखाना अवसायानात काढल्यानंतर त्याची विक्री कशा पद्धतीने झाली. क्रांती शुगरकडे कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कशा ...

ED launches probe into Parner factory purchase | पारनेर कारखान्याच्या खरेदीची ईडीकडून चौकशी सुरू

पारनेर कारखान्याच्या खरेदीची ईडीकडून चौकशी सुरू

पारनेर : पारनेर साखर कारखाना अवसायानात काढल्यानंतर त्याची विक्री कशा पद्धतीने झाली. क्रांती शुगरकडे कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कशा पद्धतीने आले, याची ईडीने चौकशी सुरू केल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

पारनेर साखर कारखाना क्रांती शुगरने विकत घेतला आहे. या विक्रीच्या विरोधात कारखाना बचाओ समितीचे प्रमुख साहेबराव मोरे, रामदास घावटे, बबन कवाद यांनी लढा सुरू केला आहे. कारखाना विक्री व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत चौकशीसाठी बचाओ समितीने थेट ईडीकडे धाव घेतली. या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांनी पारनेर कारखाना येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामगार, शेतकरी सभासद यांच्या बरोबर चर्चा केली.

यावेळी ते बोलत होते. सोमय्या म्हणाले की, सभासद व कामगार यांना न्याय देण्यासाठी आलो आहे. गरीब शेतकरी व कामगार यांच्या जीवावर कोणी बंगले बांधणार असेल, लखपती होणार असतील तर, न्यायालयाचा आदेश जर धाब्यावर बसणार असेल व कारखाना बळकाविण्याचा प्रयत्न करत असेल तर चुकीचे आहे.

कारखान्यात जर घोटाळा झाला असेल तर त्या पैशाचा हिशेब देऊन ते पैसे शेतकरी व कामगार खात्यांवर जमा झाले पाहिजे. न्यायालयाने जे चौकशी आदेश दिले आहेत; परंतु भीती दाखवून शेतकऱ्यांनी जमीन हडप करणार असेल तर सोडणार नाही. यावेळी कामगारांना अडचणीत आणणार नाही, कारखाना बंद होणार नाही, असे आश्वासन सोमय्या यांनी दिले.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, विश्वनाथ कोरडे, बचाव समितीचे साहेबराव मोरे, रामदास घावटे, बबन कवाद, सुनील थोरात, सुभाष दुधाडे, सुप्याचे उपसरपंच सागर मैड, तुषार पवार, कृष्णाजी बडवे, पोपट मोरे, खंडू भूकन आदी उपस्थित होते.

----

२३ किरीट सोमय्या

पारनेर कारखाना येथे कामगार, शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी खासदार किरीट सोमय्या.

Web Title: ED launches probe into Parner factory purchase