भाजपतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:23 IST2021-09-26T04:23:29+5:302021-09-26T04:23:29+5:30

अहमदनगर : भाजपचे मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या पुढाकारातून असंघटित कामगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा व ...

E-labor card registration by BJP | भाजपतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी

भाजपतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी

अहमदनगर : भाजपचे मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या पुढाकारातून असंघटित कामगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियाना अंतर्गत ‘ई- श्रम कार्ड’ नोंदणी व वाटपाचा प्रारंभ शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका सोनाली चितळे, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेवक रवींद्र बारस्कर, ॲड. विवेक नाईक, सुवेंद्र गांधी, उदय कराळे, संजय ढोणे, प्रशांत मुथा, अमित गटणे, गोपाळ वर्मा, महेश हेडा, आशिष अनेचा व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. ई- श्रम कार्ड योजनेेंतर्गत १२६ व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ताबडतोब २ लाखांचा अपघात विमा लागू होणार आहे. केंद्र सरकार लवकरच ५ लाखापर्यंतचा आरोग्य विमा सुरू करणार आहे. शहरातील असंघटित कामगारांनी यात नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: E-labor card registration by BJP