कोरोनाकाळात नगरमध्ये लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:17 IST2021-05-15T17:14:29+5:302021-05-15T17:17:12+5:30

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने रमजान ईद निमित्त शुक्रवारी शहरात गरजूंना फूड पॅकेटसह शेवई पाठवून वंचितांची ईद गोड करण्यात आली तसेच अक्षय तृतीया निमित्त आमरसाचे ही वाटप करण्यात आले.

During the Coronation period, the anchors in the town celebrated the Eid of the deprived | कोरोनाकाळात नगरमध्ये लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

कोरोनाकाळात नगरमध्ये लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

अहमदनगर : लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने रमजान ईद निमित्त शुक्रवारी शहरात गरजूंना फूड पॅकेटसह शेवई पाठवून वंचितांची ईद गोड करण्यात आली तसेच अक्षय तृतीया निमित्त आमरसाचे ही वाटप करण्यात आले.

रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झेंडीगेट येथे फूड पॅकेटचे पॅकिंग करून वाटण्यात आले आले. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मन्सूर शेख, उबेद शेख, डॉ. रिजवान अहमद, नगरसेवक आसिफ सुलतान, समीर खान, अर्शद शेख, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंग धुप्पड, मनोज मदान, राजा नारंग, सतीश गंभीर, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, सिमर वधवा, अर्जुन मदान, राहुल शर्मा, करण धुप्पड, सुनील थोरात, नारायण अरोरा, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, किशोर मुनोत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हरजितसिंह वधवा म्हणाले संकटकाळात हॉस्पिटलमध्ये असलेल्या सर्वसामान्यांसह गरजूंना ईद व अक्षय तृतीयाचा आनंद घेता यावा यासाठी शेवई वाटपाचा उपक्रम राबविला.

Web Title: During the Coronation period, the anchors in the town celebrated the Eid of the deprived