आम्हाला महिलांचा आदर शिकवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:11+5:302021-09-07T04:27:11+5:30

पारनेर : राष्ट्रवादी हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी आम्हाला महिलांचा आदर करायला शिकवू नये, ...

Don’t teach us respect for women | आम्हाला महिलांचा आदर शिकवू नका

आम्हाला महिलांचा आदर शिकवू नका

पारनेर : राष्ट्रवादी हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी आम्हाला महिलांचा आदर करायला शिकवू नये, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे प्रमुख पाहुणे होते. आमदार नीलेश लंके अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार नीलेश लंके यांच्यावर आरोप केले होते. याबाबत शेख यांनी वाघ यांच्यावर टीका केली.

नीलेश लंके यांच्यावर आरोप झाला. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर अस्तित्व निर्माण करीत असेल त्या वेळी ही गोष्ट कोणाच्या तरी डोळ्यांत खुपत असते. त्यातूनच असे आरोप होत असतात, असेही शेख या वेळी म्हणाले.

या वेळी बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, सरपंच राहुल झावरे, दादा शिंदे, किशोर यादव, अमित जाधव, डॉ. बाळासाहेब कावरे, संदीप चौधरी, श्रीकांत चौरे, सुभाष कावरे, भागा गावडे, आप्पा शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Don’t teach us respect for women