----------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पावसाळा सुरू असल्याने दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टाईफाईड, कावीळ, उलटी जुलाब, यासारखे आजार होत असून, पोटदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होता. पावसामुळे धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. तसेच शहरातही गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होऊन पोटदुखीच्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पाणी पिताना काळजी घेणे गरजेचे असून, पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
....
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, टाईफाईड, कावीळ,जुलाब होणे, यासारखे आजार होतात. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु, साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
.....
आजाराची लक्षणे काय?
- पोट गडगडणे
- ताप येणे
- जुलाब होणे
- पोटात दुखणे
.....
पाणी उकळून प्यायलले बरे
दूषित पाणीपुरवठा होत असल्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहेत. तसेच पाणी गाळून व उकळून पिणे आवश्यक आहे. पाणी उकळून थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
...
नगर पितात दररोज ५५ एमएलडी पाणी
नगर शहराला दररोज ५५ एमएलडी पाणी पितात. मुळा धरणातून दररोज ५५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. धरणात नवीन पाणी आल्याने काही प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, पाणी गाळून व उकळून पिणे आवश्यक आहे.
...
- पावसामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणी येत असल्यास पाणी गाळून व उकळून प्यावे. तसेच उघड्यावरचे खाणे टाळावे. पाणी पिताना काळजी घेतल्यास पोटदुखीसारखे आजार होणार नाहीत.
- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी