ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:20+5:302021-06-24T04:16:20+5:30

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा वाढीसाठी प्रशासनाने दक्ष राहावे तसेच कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ...

District Collector visits Oxygen Project of Rural Hospital | ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा वाढीसाठी प्रशासनाने दक्ष राहावे तसेच कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनीदेखील मास्कचा वापर, सामाजिक अंतरसारख्या उपायांचा अवलंब करावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या. शक्य तितकी कमी उपस्थिती ठेवून विवाह समारंभ पार पाडण्याचे व कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गावागावातील पदाधिकाऱ्यांनी हिवरेबाजारच्या धर्तीवर एकजुटीने काम करून गावे कोरोनामुक्त ठेवण्याची गरज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी प्रतिपादीत केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे उपस्थित होते.

Web Title: District Collector visits Oxygen Project of Rural Hospital