निराधार महिलांना शिवणयंत्र, पीठ गिरणीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:45+5:302021-07-24T04:14:45+5:30

जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड ...

Distribution of sewing machines, flour mills to destitute women | निराधार महिलांना शिवणयंत्र, पीठ गिरणीचे वाटप

निराधार महिलांना शिवणयंत्र, पीठ गिरणीचे वाटप

जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील निराधार महिलांना २१ शिवण यंत्र व ३३ पीठ गिरणी यंत्र देण्यात आले. ‘आधार’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला.

राेहित पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणूस गमावला आहे. हे दुःख आपल्या सर्वांसाठीच खूप मोठे आहे. मात्र या दुःखातून सावरणे गरजेचे आहे. मुलांचे शिक्षण, त्यांचे भवितव्य, घरातील मंडळींचे आजारपण आदी बाबी सांभाळताना मोठ्या जबाबदाऱ्याही सांभाळायच्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून ही माझीही जबाबदारी असल्याचे समजतो. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना थोडासा हातभार लागावा म्हणून स्वयंरोजगारासाठी ही छोटीशी मदत होईल, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गट विकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

----

२३ जामखेड पवार

नान्नज येथील कार्यक्रमात निराधार महिलांना शिवयंत्र व पीठ गिरणीचे वाटप कण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार व इतर.

Web Title: Distribution of sewing machines, flour mills to destitute women