विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST2021-02-13T04:20:34+5:302021-02-13T04:20:34+5:30

मंत्री थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रवी डोंगरे मित्र मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. यंदा ...

Distribution of school supplies to students | विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

मंत्री थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रवी डोंगरे मित्र मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. यंदा अकलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडदरा या शाळेतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक विद्यार्थांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेसाठी आई ग्रुपचे अध्यक्ष कैलास म्हात्रे यांनी पाच हजारांचा धनादेश दिला.

याप्रसंगी आई ग्रुपचे अध्यक्ष कैलास म्हात्रे, कुणाल म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते रवी डोंगरे, उद्योजक विक्रम हांडे, योगेश मस्कर, योगेश भागीत, पप्पू औटी, सुनील डोंगरे, निलेश मते, सचिन काळे, बाळसाहेब आहेर, विमल मते, रविना डोंगरे, सुधीर शेळके, बजरंग शिरोळे, सुमित लांडगे, जालिंदर वाळूंज, मुख्याध्यापिका सुशीला शिंदे, शिक्षक संदीप शिंदे उपस्थित होते.

(घारगाव)

Web Title: Distribution of school supplies to students