डाळिंबावरील तेल्या रोगाची कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:32+5:302021-07-27T04:21:32+5:30

पाथर्डी : डाळिंब पिकावर तेल्या रोगाने थैमान घातले असून सर्व बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी शेतातून बागा काढून ...

The disease of pomegranate oil should be immediately noticed by the Department of Agriculture | डाळिंबावरील तेल्या रोगाची कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी

डाळिंबावरील तेल्या रोगाची कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी

पाथर्डी : डाळिंब पिकावर तेल्या रोगाने थैमान घातले असून सर्व बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी शेतातून बागा काढून टाकत आहेत. याबद्दल कृषी विभागाची काही जबाबदारी आहे की नाही? असा सवाल स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहे. पाथर्डी तालुक्यातील निवंडुगे, कासार पिंपळगाव, ढवळेवाडी, हत्राळ, साकेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब बागा आहेत. डाळिंब बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव होत आहे. बागायतदार खर्च करून मेटाकुटीला आला आहे. तरीही तेल्यावर नियंत्रण मिळविता आले नाही. कष्टाने जगविलेल्या बागा शेतातून हद्दपार होण्याच्या स्थितीत आहेत. याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: The disease of pomegranate oil should be immediately noticed by the Department of Agriculture