शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल बंद, बसेस आगारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST

श्रीरामपूर : जिल्ह्यातील काही एसटी महामंडळाच्या आगारांना डिझेल टंचाईची झळ पोहोचत आहे. लीटरमागे ९६ रुपयांवर डिझेल दरवाढ झाल्यामुळे बसेस ...

श्रीरामपूर : जिल्ह्यातील काही एसटी महामंडळाच्या आगारांना डिझेल टंचाईची झळ पोहोचत आहे. लीटरमागे ९६ रुपयांवर डिझेल दरवाढ झाल्यामुळे बसेस बंद ठेवण्याची नामुष्की आगारांवर आली आहे. नगर जिल्ह्यात एसटीचे ११ आगार आहेत. या सर्वच आगारांमध्ये डिझेलच्या टँकरसाठी एक किंवा दोन दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. मात्र याबाबत आगार प्रमुख प्रतिक्रिया देण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

श्रीरामपूर येथील आगार प्रमुख राकेश शिवदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काही बसेसना प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे तोट्यामध्ये त्या चालविण्यात अर्थ नाही. त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्पन्न नसेल तर डिझेल उपलब्ध होत नाही. डिझेलचे दर ९५ रुपयांवर गेल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. श्रीरामपूर येथील आगाराला दर दोन दिवसानंतर एका डिझेल टँकरची आवश्यकता भासते. त्यामध्ये १२ हजार लीटर डिझेल भरलेले असते. त्यापोटी ११ ते १२ लाख रुपये खर्च होतो. मात्र त्या तुलनेत आगाराला उत्पन्न मिळत नाही.

---------

कर्जत आणि श्रीगोंद्याला फटका

श्रीगोंदा येथील आगाराचा इंधन साठा तीन दिवस संपल्यामुळे तेथे ५३ पैकी ४३ बसेस आगारातच उभ्या ठेवण्याची वेळ आली होती. १२ ऑगस्टला हा प्रकार घडला. आगारातील केवळ १० बसेसच्या फेऱ्या पूर्ण होऊ शकल्या होत्या. कर्जत येथे स्वतंत्र आगार नाही. त्यामुळे तेथे श्रीगोंदा येथून बसेस दाखल होतात. श्रीगोंदा आगाराची स्थिती डिझेलअभावी बिकट झाल्याने कर्जतला त्याचा फटका बसला होता.

-------------

एखाद-दुसऱ्या आगारामध्ये डिझेल टंचाईची स्थिती उद्भवते. मात्र कुठेही चिंताजनक परिस्थिती नाही. स्थानिक आगाराच्या उत्पन्नावर डिझेलचा पुरवठा अवलंबून नाही. विभागीय स्तरावरूनच ते पुरविले जाते.

- विजय गीते, विभागीय नियंत्रक, नगर.

---------

१०५३