वंचित आघाडीचे अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:15+5:302021-07-24T04:14:15+5:30

आघाडीचे भटके विमुक्त सेलचे सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक ...

Deprived Front Superintendent in front of the office | वंचित आघाडीचे अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

वंचित आघाडीचे अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

आघाडीचे भटके विमुक्त सेलचे सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची ॲड. जाधव, प्रतीक बारसे, काशिनाथ चौगुले, सावित्री सावंत यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या उपाेषणात वंचित बहुजन आघाडी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, फिरोज पठाण, आतिश पारवे, काशिनाथ चौघुले, दया सावंत, संतोष शेगर, अजिनाथ शिंदे, मयत शिवाजी सावंत यांची आई लिलाबाई सावंत, वडील एकनाथ सावंत, पत्नी सावित्रीबाई सावंत व मुले आदी सहभागी झाले होते. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना २९ जुलै रोजी देण्यात आले होते; मात्र निवेदन देऊन १ महिन्याचा कालावधी उलटला तरीही या प्रकरणी पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू केल्याचे ॲड. जाधव यांनी यावेळी सांगितले.

..................

फोटो २४ उपोषण

फोटो ओळी :-शिवाजी सावंत मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव समवेत मयत शिवाजी सावंत यांचे कुटुंबीय व कार्यकर्ते.

Web Title: Deprived Front Superintendent in front of the office