नेवासा तहसील कचेरीवर वंचितचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:57+5:302021-09-05T04:25:57+5:30

या आंदोलन व मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखधान व तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी केले. या आंदोलनाला सुनील ...

Deprived dam at Nevasa tehsil office | नेवासा तहसील कचेरीवर वंचितचे धरणे

नेवासा तहसील कचेरीवर वंचितचे धरणे

या आंदोलन व मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखधान व तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी केले. या आंदोलनाला सुनील वाघमारे, रवी भालेराव, विलास देशमुख, मुन्ना चक्रनारायण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव, सुनील खरात, शामराव सोनकांबळे, विजय गायकवाड यांच्यासह असंख्य दलित चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

सुखधान म्हणाले, कुकाणा येथे अतिक्रमणाच्या वादातून गोर्डे कुटुंबीयातील महिलेसह त्यांच्या कुटुंबीयांना अमानुषपणे मारहाण झालेली होती. या घटनेचा गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनला दाखल झालेला असताना मारहाण करणाऱ्या नराधमांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी विनयभंगाची खोटी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींना अटक न करता त्यांचीच फिर्याद घेत मागासवर्गीय कुटुंबीयांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप सुखधान यांनी केला. यावेळी राहुल वाघमारे, स्वप्निल सोनकांबळे, पप्पू कांबळे, बाबासाहेब साळवे, आलम पिंजारी, राजू साळवे, फ्रन्सिस जाधव, सुजित गोर्डे, नितीन भालेराव, सुनील हिवाळे, राहुल चाबुकस्वार, विशाल राजगुरु उपस्थित होते.

040921\20210904_171237.jpg~040921\20210904_171214.jpg

नेवासा : वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चाद्वारे धरणे आंदोलन~नेवासा : वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चाद्वारे धरणे आंदोलन

Web Title: Deprived dam at Nevasa tehsil office