शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री, पवार घेतील, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:44 IST

सध्या रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार मिळून घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शिवाय केंद्र सरकारने ईडीचा वापर राजकीय द्वेषापोटी करू नये, असे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमध्ये व्यक्त दिले.

अहमदनगर : सध्या रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार मिळून घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शिवाय केंद्र सरकारने ईडीचा वापर राजकीय द्वेषापोटी करू नये, असे स्पष्टीकरण नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे यांनी नगरमध्ये व्यक्त दिले.

शुक्रवारी मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत नगरविकास आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. काँग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. महाविकास आघाडीत आता हे पद कोणाकडे राहील, शिवसेना त्यावर दावा करणार आहे का? असे विचारले असता, मंत्री शिंदे म्हणाले की, हा धोरणात्मक निर्णय आहे. महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते व शरद पवार मिळून याबाबत निर्णय घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत.

राज्यात ईडीच्या कारवाया वाढल्या असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, ईडी एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये. अन्यथा लोकांचा त्यावरील विश्वास उठेल. राजकीय द्वेषापोटी कोणी ईडीचा दुरूपयोग करत असेल तर ते चुकीचे आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाministerमंत्री