Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!

Shapoor Zadran Health Updates: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा एकेकाळचा आधारस्तंभ आणि आक्रमक डावखुरा वेगवान गोलंदाज शापूर झादरान सध्या एका अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रासला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:07 IST

Open in App

नवी दिल्ली: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा एकेकाळचा आधारस्तंभ आणि आक्रमक डावखुरा वेगवान गोलंदाज शापूर झादरान सध्या एका अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रासला आहे. ३८ वर्षीय शापूरवर सध्या दिल्लीतील एका नामांकित रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. शापूर झादरानच्या आजारपणामुळे क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत असून, तो या संकटातून लवकर बाहेर पडावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत

काय आहे हा दुर्मीळ आजार?

शापूरला 'हेमोफॅगोसिटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस' (HLH) या अत्यंत गंभीर आजाराचे निदान झाले आहे. या आजारामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अनियंत्रित होऊन स्वतःच्याच पेशींवर हल्ला करू लागते. याचा थेट परिणाम अस्थिमज्जा, यकृत, प्लीहा आणि लिम्फ नोड्सवर होतो, ज्यामुळे हे महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची भीती असते.

गेल्या वर्षापासून आजाराशी लढा

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शापूरला पहिल्यांदा अस्वस्थ वाटू लागले होते. स्थानिक पातळीवर उपचार केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, अफगाणिस्तानमधील डॉक्टरांनी त्याला तातडीने पुढील उपचारांसाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

शापूर झादरानची कारकीर्द

आंतरराष्ट्रीय पदार्पण: २००९ मध्ये अफगाण क्रिकेटच्या उदयोन्मुख काळात शापूरने पदार्पण केले.सामने: त्याने आपल्या कारकीर्दीत ४४ एकदिवसीय आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.ऐतिहासिक कामगिरी: २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला स्कॉटलंडविरुद्ध पहिला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात शापूरने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ठोकलेला विजयी चौकार आजही अफगाण क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan's Shapoor Zadran battles rare disease, unrecognizable now.

Web Summary : Afghan cricketer Shapoor Zadran is battling HLH, a rare immune disorder, in Delhi. The 38-year-old, pivotal in Afghanistan's early cricket success, is in critical condition. He played 44 ODIs and 36 T20s, contributing significantly, including the 2015 World Cup victory.
टॅग्स :ऑफ द फिल्ड