शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणात महिलेचा मृत्यू

By admin | Updated: July 7, 2014 23:37 IST

अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला.

अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला. त्यामुळे तब्बल बारा तास ताटकळलेल्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. अखेर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तो मृतदेह पुणे येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र या प्रकाराने पोलीस आणि जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.
अश्विनी दत्तात्रय इजारे (मूळ रा. सोलापूर, पाथर्डीला माहेर)ही महिला बाळंतपणासाठी दोन-तीन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. रविवारी रात्री ती बाळंत झाली आणि तिला मुलगा झाला. मात्र बाळंतपणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. रक्तस्त्राव झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. परंतु डॉक्टरांच्या संपामुळे मृतदेह बराचवेळ ताटकळत पडला. बाळंतपणात मृत्यू झालेल्या महिलेचे शवविच्छेदन पुणे किंवा औरंगाबाद येथे करण्यात येते.
जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासन यांची कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर पाठविला जातो. नेमक्या या प्रक्रियेची माहिती मयताच्या नातेवाईकांना दिली गेली नसल्याने ते संतप्त झाले. रात्रभर मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅम्ब्युलन्समध्येच ठेवल्याने नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाशीही संपर्क साधला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोलीस अधिकाऱ्याच्या सहीसाठी मृतदेह ताटकळत पडला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
सोमवारी सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि पोलीस व डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह पुणे येथे पाठविण्यात आला. महिलेला झालेले बाळ सुरक्षित असून त्याला महिलेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. (प्रतिनिधी)