नर जातीचा मृत बिबट्या आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:49+5:302021-06-04T04:16:49+5:30

टाकळीभान कारेगाव रस्त्यालगत जालिंदर जगधने यांची शेती आहे. मृत बिबट्याची माहिती जगधने यांचे नातलग भास्कर साळुंके यांनी उपसरपंच कान्हा ...

A dead male leopard was found | नर जातीचा मृत बिबट्या आढळला

नर जातीचा मृत बिबट्या आढळला

टाकळीभान कारेगाव रस्त्यालगत जालिंदर जगधने यांची शेती आहे. मृत बिबट्याची माहिती जगधने यांचे नातलग भास्कर साळुंके यांनी उपसरपंच कान्हा खंडागळे यांना दिली. त्यानंतर खंडागळे यांनी वनविभागाला माहिती कळविली. त्यानंतर श्रीरामपूर येथील वनरक्षक विकास पवार यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा पंचनामा केला. बिबट्याने विषारी काहीतरी भक्षण केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनरक्षक पवार यांनी व्यक्त केला. हवालदार अय्युब शेख, होमगार्ड हाळनोर जिवरग, बाबा सय्यद, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, अभिजित कापसे, अमित कापसे, मधुकर मैड, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, विलास सपकळ, राम बोडखे, भास्कर साळुंके, सुरेश बनकर आदी उपस्थित होते.

---

Web Title: A dead male leopard was found