शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

काविळीच्या साथीचा धोका

By admin | Updated: September 5, 2014 23:48 IST

अहमदनगर : शहरातील काविळीची साथ जिल्ह्यात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अहमदनगर : शहरातील काविळीची साथ जिल्ह्यात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यात काविळीचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार केलेल्या पाहणीत त्या ठिकाणी दोन रुग्ण स्थानिक असून उर्वरित स्थलांतरित असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.कर्जत तालुक्यात काविळीचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेला मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी अतिरिक्त आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांचे पथक कर्जतला पाठविले. त्यांनी त्या ठिकाणी कावीळ साथीची माहिती घेतली. तसेच रुग्णांची पाहणी केली. डॉ. सांगळे यांच्या माहितीनुसार कर्जत शहरात काविळीचे सहा रुग्ण असल्याची माहिती मिळाली होती. प्रत्यक्षात शुक्रवारी त्यांनी स्वत: केलेल्या पाहणीत प्रत्यक्षात अवघे २ रुग्ण आढळले असून अन्य रुग्ण स्थलांतरित असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाने कर्जत शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आणि ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा विभाग यांना पाणी शुध्दीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नगर शहरातील काविळीचा साथीचा धोका जिल्ह्यात पसरण्याचा धोका आहे. नगर शहरात काविळी सोबत डेंग्यूचे रुग्ण वाढले असून आतापर्यंत डेंग्यूची लागण झाली असल्याचे दहा रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)