शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर खुर्द शिवारात दरोडा

By admin | Updated: August 5, 2014 23:58 IST

चंदनापुरी : अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने संगमनेर खुर्द शिवारात घरावर दरोडा घालून मारहाण करीत सोन्याचे दागिने लांबविले.

चंदनापुरी : अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने संगमनेर खुर्द शिवारात घरावर दरोडा घालून मारहाण करीत सोन्याचे दागिने लांबविले. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत घडलेल्या या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात ९-१० दरोडेखोरांनी सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील नाशिक-पुणे महामार्गालगत राहणाऱ्या वर्पे कुटुंबीयांना लक्ष्य केले. अंधाराचा फायदा घेत स्वयंपाकघरातील खिडकीच्या खालच्या विटा अलगदपणे काढून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील अण्णासाहेब वर्पे, लक्ष्मीबाई वर्पे, सोमनाथ वर्पे, सुरेखा वर्पे, ताई शिंदे, किसन शिंदे व विजय बालोडे यांना हातातील काठ्या व कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. घरातील सामानाची उचका-पाचक करून लक्ष्मीबाई वर्पे यांच्या गळ्यातील सुमारे ३२ हजार रूपये किमतीचे १ तोळे सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने लांबविले. या प्रकरणी राजू अण्णासाहेब वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात ९-१० दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी करीत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक गांगुर्डे व पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)